List of Marathi Mhani

Marathi Varsa
2 min readOct 11, 2020

--

मराठीत बऱ्याच अशा म्हणी आहेत कि ज्या काळाच्या ओघात विसरून चाललेल्या आहेत. या लेखात मी मला माहीत असलेल्या सर्व Marathi Mhani वाचकांसाठी उपलब्ध करत आहे. तुम्हालाही जर एखादी म्हण माहीत असेल व ती इथे दिलेली नसेल तर कृपया comment मध्ये नोंदवा.

Source: MarathiVarsa

⇒ आत्याबाईला जर मिशा असत्या तर
नेहमी एखाद्या कामात जर तर या शक्यतांचा विचार करणे.

⇒ आपल्याच पोळीवर तूप ओढणे
फक्त स्वतःचाच तेवढा फायदा साधून घेणे.

⇒ आलिया भोगासी असावे सादर
तक्रार व कुरकुर निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे.

⇒ आवळा देऊन कोहळा काढणे
आपला स्वार्थ साधण्यासाठी एखाद्या व्यक्तीला लहान वस्तू देऊन मोठी वस्तू मिळविणे.

⇒ आपण मेल्यावाचून स्वर्ग दिसत नाही
अनुभवाशिवाय शहाणपण नसते.

⇒ आपले नाक कापून दुसऱ्यास अपशकुन
दुसऱ्याचे नुकसान करण्यासाठी प्रथम स्वतःचे नुकसान करून घेणे.

⇒ आधीच तारे, त्यात गेले वारे
विचित्र व्यक्तीच्या वर्तनात भर पडणारी घटना घडणे.

⇒ आधीच मर्कट तशातही मद्य प्याला
आधीच करामती व त्यात मद्य प्राशन केल्याने अधिकच विचित्र परिस्थिती निर्माण होते.

⇒ अडक्याची अंबा आणि गोंधळाला रुपये बारा
मुख्य गोष्टीपेक्षा अनुषंगिक गोष्टींचाच खर्च जास्त असणे.

⇒ आग रामेश्वरी, बंब सोमेश्वर
रोग एकीकडे, उपाय भलतीकडे.

⇒ आयजीच्या जीवावर बायजी उदार
दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखवणे.

⇒ आग खाईल तो कोळसे ओकेल
जशी करणी तसे फळ

⇒ आठ पूरभय्ये नऊ चौबे
खूप निर्बुद्ध लोकांपेक्षा चार बुद्धिमान पुरेसे.

⇒ आधणातले रडतात व सुपातले हसतात
संंकटात असतानाही दुसर्‍याचे दुःख पाहून हसू येते.

अंगाले सुटली खाज, हाताला नाही लाज
गरजवंताला अक्कल नसते

अंगावरचे लेणे, जन्मभर देणे
दागिन्याकरिता कर्ज करून ठेवायचे आणि ते जन्मभर फेरीत बसायचे.

अंत काळापेक्षा मध्यान्हकाळ कठीण
मरण्याच्या वेदनांपेक्षा भुकेच्या वेदना अधिक दुःखदायक असतात.

अंधारात केले, पण उजेडात आले
कितीही गुप्तपणे एखादी गोष्ट केली तरी ती काही दिवसांनी उजेडात येतेच

अक्कल नाही काडीची नाव सहस्त्रबुद्धे
नाव मोठे लक्षण खोटे

अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था
अशक्यकोटीतील गोष्टी

अती झाले अन आसू आले
एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की ती दुःखदायी ठरते

अतिपरिचयात अवज्ञा
जास्त जवळीकता झाल्यास अपमान होऊ शकतो

अती झाले गावचे अन पोट फुगले देवाचे
कृत्य एकाचे त्रास मात्र दुसऱ्यालाच

अन्नाचा येते वास, कोरीचा घेते घास
अन्न न खाणे;पण त्यात मन असणे

Click here to get 500+ Marathi Mhani List

--

--

Marathi Varsa
Marathi Varsa

No responses yet